पुणे शहर

कर्वेनगरमध्ये पतीकडून पत्नीचा निर्घृण खून ; वारजे पोलिसांनी आरोपीला पाच तासात पकडले..

कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये आज सकाळी खुनाचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आणि ही खबर वाऱ्यासारखी वारजे कर्वेनगर मध्ये पसरली. पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने निघृण खून करत पलायन केले मात्र वारजे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पाच तासात आरोपीला ताब्यात घेतले. Brutal murder of wife by husband in Karvenagar; Warje police nabbed the accused in five hours..

वारजे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा लखन कांबळे (वय २७, रा. संभानगर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा पती लखन बालाजी कांबळे (वय.३० रा. संभानगर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

पत्नी पुजा हिचा लखन कांबळे याने सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला यानंतर तो दुचाकी घेऊन सोलापूरच्या दिशेने पळून गेला. घटनेची माहिती मिळताच, कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे , वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर , पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व तपासाची सूत्रे फिरवली.

Img 20231112 wa00053541767882370111537

वरिष्ठांच्या आदेशानुसार वारजे पोलिसांच्या तपास पथकाने तपासाला वेग दिला. पोलिसांना लखन कांबळे हा उस्मानाबादला जाण्यासाठी दुचाकीवरून सोलापूर रस्त्याने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ श्रीकांत भांगरे यांच्या पथकाने जिल्हा हद्दीबाहेर जाण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेतले.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये