सोमवार पासून शाळा सुरू होणार का ? राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज होणार निर्णय

मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असताना आता आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.
शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागानं मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवलाय. येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात तसंच शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळं सोमवारपासून शाळा सुरू होणार का?याकडे आता लक्ष लागून आहे.
सोमवारपासून राज्यात शाळा सुरू होणार का?याकडे आता लक्ष लागून आहे. शाळा सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.




