घरबसल्या असे लिंक करा आधारसोबत रेशन कार्ड

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ची सुरुवात केली असून, याद्वारे देशातील कोणत्याही भागात धान्य मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र तुमचे रेशन कार्ड-आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. तुम्ही जर हे लिंक केले नसेल तर ते कसे करायचे याची प्रोसेस आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत.
अशी आहे प्रोसेस
सर्वात प्रथम तुम्ही uidai.gov.in या वेबसाइटवर जा.
त्यानंतर ‘Start Now’ या ठिकाणी क्लिक करा.
त्यानंतर तुमचा पत्ता, जिल्हा व राज्य याची माहिती द्या.
यानंतर ‘Ration Card Benefit’ पर्यायावर क्लिक करा.
आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ई-मेल आणि मोबाइल नंबर ही माहिती द्या. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यावर तुमची प्रोसेस पुर्ण होईल.
या अॅपचा करा उपयोग
शिधापत्रिकेसाठी तुम्ही मेरा रेशन अॅपच्या मदतीने रजिस्ट्रेशन करू शकता. याशिवाय रेशन कार्ड डाउनलोड देखील करता येईल. रेशन-आधार कार्ड लिंक आहे हे तपासता येईल आणि लिंक देखील करता येईल. शिधापत्रिकेवर किती धान्य वितरित केले आहे आणि आजुबाजूच्या रेशन डीलरच्या दुकानांची माहिती देखील मिळेल.




