पुणे शहर

अण्णांची लेक” पुरस्कार कर्वे संस्थेची विद्यार्थिनी कु.आर्या व्यवहारे हिला प्रदान..

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या १२६ व्या स्थापना दिनानिमित्त देण्यात येणारा अण्णांची लेक” पुरस्कार कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, पुणे, मेकॅनिकल विभागात शिक्षण घेत असलेली कु.आर्या व्यवहारे हिला संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. Annachi Lake “Award given to Ms. Arya Vyavahare, a student of Karve Institute.

अमेरिकन सोसायटी ऑफ  मेकॅनिकल इंजिनिअर्स, न्यूयॉर्क या संस्थेच्या चार्लस टी मेन लीडरशिप ॲवॉर्ड साठी संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, पुणे, मेकॅनिकल विभागात शिक्षण घेत असलेली कु.आर्या व्यवहारे  हिची निवड करण्यात आली आहे. अमेरिकन सोसायटी आफॅ मेकॅनिकल इंजिनिअर्स, न्यूयॉर्क च्या ९५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका भारतीय विद्यार्थिनीला मिळाला आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल संस्थेचा सन २०२१ मधील “अण्णांची लेक”  हा पुरस्कार कु.आर्या व्यवहारे हिला प्रदान करण्यात आला .

Img 20210522 wa0203

शासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून संस्थेच्या कर्वेनगर परिसरातील मैदानावरील महर्षी कर्वे यांचे समाधी स्थान येथे प्रार्थना झाल्यानंतर मैदानावरील महर्षी कर्वे यांचे समाधी स्थान येथे हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव,  व्यस्थापक मंडळाचे सभासद जयंत इनामदार, सचिव डॉ.पी.व्ही.एस.शास्त्री आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये