कोथरुड

अबब कोथरुड मध्ये महापालिकेने वसूल केला सुमारे ५० हजाराचा दंड..

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने धडक दंडात्मक कारवाई

कोथरुड : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक १२ डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण परिसरात दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नियम तोडणाऱ्या नागरिकांकडून ४९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. In Kothrud, the Municipal Corporation collected a fine of around Rs 50,000.

सदर प्रबोधनात्मक व दंडात्मक मोहीम राबवण्यासाठी कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रत्येक आरोग्य कोठीवर एक पथक याप्रमाणे एकूण १३ पथके तयार करून ही मोहिम राबविण्यात आली. या मोहीमेअंतर्गत डहाणूकर कॉलनी, गांधी भवन परिसर, गोपीनाथनगर, लक्ष्मीनगर, सहजानंद सोसायटी, गणंजय सोसायटी, बधाई चौक, भेलके नगर चौक, शिवाजी चौक, कर्वे पुतळा चौक, कोथरूड बस स्टॅन्ड, नाईक पूल, तेजस नगर, कोथरूड गावठाण परिसर, मंत्री पार्क, कुमार परिसर, आशिष गार्डन चौक, सुतार दवाखाना परिसर, विवेकानंद चौक, येथे कारवाई करण्यात आली.

IMG 20210522 WA0203

वरील परिसरातील भाजी विक्रेते, पथारीवाले, फळ विक्रेते, सर्व दुकानदार तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन न केल्यामुळे प्रबोधनात्मक व दंडात्मक कारवाईची बेधडक मोहीम राबवण्यात आली. ही कारवाई करत असताना नागरिकांना प्रथम गांधीगिरीच्या माध्यमातून नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, गर्दी करणे, व्यापाऱ्यांनी वेळेचे बंधन न पाळणे, कचरा वर्गीकरण न करणे, रस्त्यावर लघुशंका करणे तसेच झोपडपट्टीच्या परिसरात उघडयावर शौचास बसणे इत्यादी कारणास्तव ५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ४९,५००/- रुपये शुल्क वसूल करण्यात आले.

IMG 20210611 WA0003

सदर मोहीम कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, गणेश चोंधे, करण कुंभार, यांच्या निरीक्षणाखाली मुकादम वैजिनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, सतीश सोनवणे, माधव राठोड या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये