कोथरुड

कोथरूड मधील सागर कॉलनी येथील नाल्याकडेच्या सीमाभिंतीचे काम व आशिष गार्डन चौकातील रस्त्याच्या कामाबाबत महापौर व आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले हे आदेश…

कोथरूड :  कोथरूड येथील डीपी रोड आशिष गार्डन चौक येथील रस्त्याचे उर्वरीत काम व नाल्यातून येणारे पावसाचे पाणी सागर काॅलनी, श्रीकृष्ण नगर, शास्त्रीनगर येथील घरांमध्ये घुसू नये यासाठी नाल्याच्या कडेने बांधण्यात येणाऱ्या सिमाभिंतीच्या कामाची पाहणी आज महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्तांनी केली. The mayor and the commissioner gave the order to the officials regarding the work of the boundary wall near the nala at Sagar Colony in Kothrud and the road work at Ashish Garden Chowk …

मागील वर्षी पावसात या भागातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार व  नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांच्या पाठपुराव्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या महापौर विकासनिधीतून सदर नाल्याला सीमाभींत घालण्याचे काम चालू असून कामाची सद्यस्थितीचा आढावा आज महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला.

Img 20210522 wa0203

यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील,  नितीन उदास, कोथरूड सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे,  महानगर पालिकेचे संबंधित विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अॅड.गणेश वरपे, विलास  मोहोळ, सागर कडू, कैलास मोहोळ, प्रदिप जोरी, रूपेश भोसले,  विजय राठोड, अभिजीत ठाकूर, कुंडलीक दुपारगुडे, नामदेव कानगुडे आदि पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी नाल्याकडेने बांधण्यात येत असलेल्या सिमाभिंतीचे उर्वरीत काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना महापौर आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना व विभागाला दिल्या तसेच डीपी रोड मधील झाडे काढण्याची परवानगी मिळाली असून ती झाडे त्वरीत काढण्याचे आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये