महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये