पुणे शहर, जिल्हा

पुणे शहर रचणार भक्तामर भक्तीचा नवा इतिहास !

‘अंतरराष्ट्रीय भक्तामर दिवस २०२६’ निमित्त भव्य भक्तामर भक्त कल्याण महोत्सवाचे आयोजन

कोथरुड  : सकल जैन समाज, पुणे- पिंपरी-चिंचवड आणि आगाज २०२६ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ‘अंतरराष्ट्रीय भक्तामर दिवस २०२६’ निमित्त ‘भक्तामर भक्त कल्याण महोत्सवा’चे भव्य आयोजन शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात करण्यात आले आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

अभिनव मानतुंग विश्वसंत, भक्तामरवाले बाबा आचार्य श्री प्रणाम सागरजी महाराज यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून भक्तामर स्तोत्राविषयी श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि श्रमणोपाध्याय श्री विभंजनसागर जी गुरुदेव यांच्या मंगल सानिध्यात जैन सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे ३० दिगंबर जैन मंदिरांचा सहभाग या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून, जैन समाजाच्या एकतेचे आणि सामूहिक भक्तीचे भव्य दर्शन या निमित्ताने घडणार आहे.

भव्य भक्तामर शोभायात्रेने होणार महोत्सवाचा प्रारंभ

महोत्सवाची सुरुवात सकाळी ६.४५ वाजता भव्य भक्तामर शोभायात्रेने सिंहगड रोड, राजाराम पूल ते बडजात्या मंडपम, पंडित फार्म, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे असा शोभायात्रेचा मार्ग असणार आहे. भक्तामर स्तोत्राचा जयघोष, भक्तिमय वातावरण आणि जैन समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शोभायात्रा विशेष आकर्षण ठरणार आहे.

यानंतर पंडित फार्म, बडजात्या मंडपम, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे येथे सकाळी ७ वाजल्यापासून मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल.

भक्तामर हीलिंग व विशेष गर्भसंस्कार

महोत्सवातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून सकाळी ७.३० वाजता विशेष भक्तामर हीलिंग व गर्भसंस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी ९ वाजून ९ मिनिटे ९ सेकंद नंतर सुरू होणार भक्तामर स्तोत्राचा सामूहिक निनाद

या महोत्सवातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण क्षण म्हणजे सकाळी ९ वाजून ९ मिनिटे ९ सेकंदांनी एकाच वेळी होणारा सामूहिक भक्तामर स्तोत्राचा निनाद. यावेळी भक्तामर स्तोत्रासोबत ऋद्धी मंत्र व सूर्य मंत्राचे सामूहिक पठण करण्यात येणार असून, भक्तांचे आध्यात्मिक शुद्धीकरण, ध्यान आणि भक्तामर हीलिंग व संस्काराचा अनुभव देण्यात येणार आहे.

‘भक्तामर आगाज–२’ मधून जैन एकतेचा संदेश

‘भक्तामर आगाज–२’ हा या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण असणार आहे. प्रथमच सामूहिक क्षमावाणीचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला असून, समस्त दिगंबर जैन समाजाने एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन ‘एक समाज, एक मंच, एक भावना आणि एकता’ हा संदेश देण्याचा संकल्प केला आहे.

यासोबतच भक्तामर स्तोत्रावर आधारित विशेष काव्य व नृत्य सादरीकरणेही करण्यात येणार असून, भक्ती, संस्कार आणि कलात्मकतेचा अनोखा संगम उपस्थितांना अनुभवता येणार आहे.

या ऐतिहासिक भक्तामर महोत्सवात पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्ती, संस्कार आणि जैन एकतेचा हा अनोखा सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये