नाना पाटेकरांचं निधन! वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन झालं आहे. गोव्यात नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकरांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालं.
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान, ख्यातनाम आणि प्रभावशाली अभिनेते, लेखक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेला समाजभान जपणारा अभिनेता असा असा अचानक निघून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार डायलॉग डिलिव्हरी आणि वास्तववादी अभिनयाने एक वेगळी छाप सोडली.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारं नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला.
नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
नाना पाटेकर यांनी ‘गमन’ 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ही भूमिका इतकी छोटी होती की, ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्ष नाना सिनेमात मिळेल ती भूमिका करत राहिले ‘गिद्ध’, ‘भालू’, ‘शीला’ या सिनेमांतही नानांनी काम केलेलं. यांपैकी एकही सिनेमा विशेष कमाई करू शकला नाही.
राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आज की आवाज’ सिनेमात नाना पाटकेर सहनायक होते. नानांच्या कामाचं कौतुक झालं, पण सिनेमा काही चालला नाही. नानाची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘अंकुश’ हा सिनेमा. 1986 मध्ये आलेल्या सिनेमात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका साकारली. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.
1988 मधील ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने नानांकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधलं. मात्र 1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.



