पुणे शहर

विश्वाला साकारणाऱ्या बाप्पाची मूर्ती साकारण्यात गुंतले लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतचे हात..

स्वप्नील दुधाने आयोजित पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारण्याच्या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये  रविवारची सकाळ लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचेच हात गुंतले ते विश्वाला साकारणाऱ्या बाप्पाला साकारण्यात..ही सकाळ सर्वांसाठीच संस्मरणीय ठरली कारण गणेश मूर्ती साकारण्यात सर्वच जण तनमानाने एकाग्र होऊन मग्न झाले होते. निमित्त होते ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारण्याच्या प्रशिक्षण शिबिराचे. सन २०२१ पासून सलग चार वर्षे हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तब्बल ४५० नागरिकांसह चिमुकल्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

Img 20250824 wa02035310208466924518520

कर्वेनगर मधील  भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या प्रांगणात ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने आपल्या नावाची नोंदणी करत अनेक चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह वेळेपूर्वी उपस्थिती दर्शवली. चिमुकल्यांच्या किलबिलाटाने भरून गेलेल्या या सोहळ्यात गणरायाला साकारण्यासाठी आवश्यक ती सामुग्री मोफत उपलब्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये आसन व्यवस्था, माती, पॅड, टूथपीक तसेच अन्य सामुग्री यांचा समावेश होता.

Img 20250508 wa00018046597267745442111

यावेळी लहान मुलांसोबत या उपक्रमात सहभागी होऊन आम्हीही लहान झालो. गणेश मूर्ती साकारताना मन भारावून गेले स्वप्निल दुधाने यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याने मनापासून त्यांचे धन्यवाद अशा भावना ज्येष्ठांनी व्यक्त केल्या तर  गणेश मूर्ती बनवण्याची खूप उत्सुकता होती आणि आज आपल्या हाताने ती साकारली त्यामुळे मनाला आनंद मिळत आहे. गणेश मूर्ती बनवताना खूप मज्जा आली अशा भावना लहान मुले व्यक्त करत होती.

Img 20250824 wa02025903052564701926874
Img 20250824 wa02018171803697671101253

स्वप्नील दुधाने म्हणाले, चिमुकल्यांच्या सोबतीने अनेक पालक आणि ज्येष्ठ नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आणि पुन्हा एकदा आपले बालपण अनुभवू शकले. विश्वाचा साकार करणाऱ्या गणरायाला साकारण्याचा हा उपक्रम आबालवृध्दांना भुरळ पाडणारा होता.  असे उद्गार अनेक नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत असल्याने  मनाला  समाधान मिळाले. नि:संकोच आणि आनंदाने सहभागी होणाऱ्या लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद निव्वळ अवर्णनीय होता, ज्यामुळे ट्रस्टच्या सभासदांनी घेतलेल्या परिश्रमांचे खऱ्या अर्थाने चीज झाले.

याप्रसंगी सूत्रसंचालक यांनी गणपतीचा आवडता पदार्थ विचारता मुलांनी एकमुखाने मोठ्या आवाजात दिलेले मोदक हे उत्तर आणि त्यांनंतर शेवटी सर्वांना दिलेले उकडीचे मोदक हा कार्यक्रमाचा शेवट सर्वांचेच तोंड गोड करणारा ठरला.

Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये