पुणे शहर

कोथरूडमध्ये जुनी इमारत पाडताना शेजारील रहिवाशी सोसायटीकडे कलंडली; संभाव्य धोका टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू

पुणे : कोथरूड भागातील डावी भुसारी कॉलनी येथील शुभंकर सोसायटीची जूनी इमारत पुनर्विकासासाठी पाडण्यात येत असताना चुकीच्या पद्धतीने इमारत पाडताना शेजारील कलाग्राम सोसायटीच्या इमारतीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

कोथरूड भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. माञ अनेक वेळा जुन्या इमारतीचे पाडकाम करताना योग्य पद्धत न वापरल्याने अपघात घडत आहेत.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

आज (शनिवारी) दुपार पासून कोथरूड भागातील डावी भुसारी कॉलनी येथील शुभंकर सोसायटीची जूनी इमारत पुनर्विकासासाठी पाडण्यात येत असताना चुकीच्या पद्धतीने इमारत पाडताना शेजारील कलाग्राम सोसायटीच्या इमारतीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

स्थानिक आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेविका अल्पना वरपे, गणेश वरपे, प्रशांत कनोजिया आणि परिसरातील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

गणेश वरपे म्हणाले, दुपारी या घटनेची माहिती मिळताच मी पुणे महापालिका आणि संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहे. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये