राष्ट्रीय

गुजरातमध्ये उड्डाण घेताच प्रवाशी विमान कोसळले. विमानातून 232 प्रवाशी करत होते प्रवास; बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू 

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले असून या विमानात 232 लोक होते अशी माहिती समोर आली आहे. अहमदाबाद विमानतळाजवळील  मेघानीनगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी (12 जून) अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर लगेच कोसळले. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. तर दुसरीकडे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात दुसऱ्या रांगेत बसले होते. सोशल मीडियावर त्यांचे तिकीट देखील व्हायरल होत आहे. मात्र माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सध्या कोणत्या अवस्थेत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये