केळेवाडी परिसरात कोपरा सभेतून ॲड रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी व्यक्त केला विजयाचा निर्धार…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केळेवाडी परिसरातील अमरज्योत मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ आणि दुर्गा माता मित्र मंडळ येथे आयोजित काँग्रेस उमेदवार ॲड रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम,नयना शिवाजी सोनार आणि दीपाली संतोष डोख यांच्या प्रचारार्थ कोपरा सभांमध्ये उमेदवारांनी नागरिक बंधू भगिनींशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध विकासकामांची आणि प्रगतीपथावर असणाऱ्या कामांची माहिती दिली. तसेच त्यांचे विविध प्रश्न जाणून घेतले.
ॲड रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम म्हणाले,केळेवाडी परिसरात आम्ही वर्षानुवर्षे केलेल्या कामामुळे सर्व नागरिक आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामूळे आजच्या कोपरा सभेतून आम्ही विजयी होणार असा ठाम विश्वास वाटत आहे.
यावेळी उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हाच प्रतिसाद आमच्या विजयाची साक्ष देणारा असणार आहे.माझ्यासह नयना शिवाजी सोनार आणि दीपाली संतोष डोख यांना प्रचंड पाठींबा देण्याचे आवाहन कदम यांनी केले.




