रक्तदानाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नगरसेवक निलेश कोंढाळकर मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड येथील उत्सव सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक निलेश कोंढाळकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या सेवाभावी उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदानाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. या शिबिरामध्ये 312 रक्तदात्यांकडून रक्तदान करीत शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी मुरलीधर मोहोळ हे स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले आणि त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण सेवाभावी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नगरसेवक निलेश कोंढाळकर म्हणाले, मुरलीधरअण्णांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान महासंकल्प दिनासारखे उपक्रम आयोजित केले जातात. यामुळे पुण्यातील रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यास मदत होते आणि समाजात सेवाभावाची भावना दृढ होते. कोथरूड भागातील या शिबिरात स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .रक्तदात्यांनी केवळ शुभेच्छाच नव्हे तर प्रत्यक्ष रक्तदान देऊन अण्णांच्या वाढदिवसाला मोठे सामाजिक योगदान दिले आहे. पुणेकरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.



या शिबिराला त्रिमूर्ती मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ (दोस्ती ग्रुप), अखिल सागर कॉलनी मित्र मंडळ, राजा शिवराय मित्र मंडळ (विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ), गजानन मित्र मंडळ आणि हिंदुत्व मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आणि जनसेवा ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले. विविध मित्र मंडळांच्या सक्रिय सहभागामुळे शिबिराची व्यवस्था सुरळीत पार पडली आणि मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित राहिले.



नगरसेवक निलेश कोंढाळकर आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकारामुळे तसेच सहभागी सर्व मित्र मंडळांच्या सहकार्यामुळे हे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी झाले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकतेची आणि मानवतेची भावना मजबूत होते,






