पुणे शहर

नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे प्रत्येक कार्यक्रम लोकांना समर्पित असतात : अमृता फडणवीस

निवडणुकीपुरते नाही, नातं मनापासून… ११ वर्षांपासून घराघरात दिवाळीचा आनंद पोहोचवणारे किरण दगडे पाटील : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : “दिवाळीचा दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. मात्र आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करताना, गोडधोड करताना दुसऱ्याच्या घरीही हा आनंद पोहोचतोय का, याचा विचार केला पाहिजे. या दिव्यातून केवळ प्रकाश नव्हे, तर प्रेमाची ज्योत पेटवायची आहे,” असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले. गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने प्रभागातील नागरिकांची दिवाळी आनंदी करण्यासाठी प्रयत्नशील असणारे नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले..

Fb img 1793625480629


नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १० भुसारी कॉलनी-बावधन परिसरातील ७ हजारांहून अधिक नागरिकांसाठी दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका अल्पना वरपे, बावधनच्या माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील, बबनराव दगडे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री स्नेहल तरडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Img 20261029 wa00153082406691295416280

अमृता फडणवीस म्हणाल्या, “आज येथे स्त्रियांच्या शक्तीचा समुद्र पाहायला मिळत आहे. कोथरूड-बावधनमध्ये येणे मला नेहमीच आवडते. येथे आल्यानंतर आपुलकीची जाणीव होते. हे आपले लोक आहेत आणि मनाने खरे लोक आहेत.”

किरण दगडे पाटील यांचे प्रत्येक कार्यक्रम लोकांना समर्पित असतात, असे सांगताना त्या म्हणाल्या की, “ते जेव्हा मला भेटतात, तेव्हा लोकपयोगी कार्यक्रम आणि उपक्रम घेऊनच भेटतात. प्रभागातील क्रीडा संकुल असो, काशी यात्रेचा उपक्रम असो किंवा प्रत्येक घरात आनंदाची दिवाळी पोहोचविण्याचा आजचा उपक्रम असो, त्यांच्या मनात कायम लोकांसाठी काहीतरी करण्याची भावना असते.”

“स्त्री ही कुटुंबाच्या अडचणीच्या काळात कायम पुढे असते. त्यामुळे ती केवळ सणाच्या दिवशी नव्हे, तर कायम आनंदी असली पाहिजे. किरण दगडे पाटील हे एक भाऊ म्हणून महिलांच्या पाठीशी कायम उभे राहिले आहेत,” असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Fb img 1793342454540


माजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी किरण दगडे पाटील यांच्या अकरा वर्षांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “सातत्याने अकरा वर्षे दिवाळी सरंजाम वाटपाचा कार्यक्रम घेणे ही अत्यंत प्रामाणिक भावना आहे. निवडणुका जवळ आल्या की असे कार्यक्रम अनेकजण करतात; मात्र अकरा वर्षे सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवण्यामागे प्रभागातील शेवटच्या घरापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचला पाहिजे, ही भावना आहे.”

Fb img 1793633997788

“निवडणुका येतात आणि जातात; मात्र किरण दादा आणि नागरिकांचे नाते राजकारण आणि निवडणुकांपलीकडचे आहे. त्यांच्या आचरणातून हे नाते निर्माण झाले आहे,” असे मोहोळ म्हणाले.

किरण दगडे पाटील यांनी प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविल्याचे सांगत त्यांनी काशी, उज्जैन, अयोध्या यांसारख्या पवित्र स्थळी प्रभागातील सुमारे २० हजार नागरिकांना नेण्याचा उपक्रम राबविला असल्याचेही नमूद केले. कोविडच्या काळातील त्यांच्या कामाचाही आपण साक्षीदार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

Fb img 1793634056727

“हा कार्यक्रम म्हणजे ११ वर्षांपासून जपलेल्या कौटुंबिक नात्याचा सोहळा” : किरण दगडे पाटील

किरण दगडे पाटील यांनी हा उपक्रम केवळ दिवाळी सरंजाम वाटपाचा कार्यक्रम नसून ११ वर्षांपासून जपलेल्या कौटुंबिक नात्याचा, विश्वासाचा आणि सामाजिक बांधिलकीचा सोहळा असल्याचे सांगितले.

“२०१६ साली सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिवाळी सरंजाम वाटपाचा संकल्प केला. गेली अकरा वर्षे कोणताही खंड न पडता हा उपक्रम सुरू आहे. या काळात आयुष्यात अनेक चढ-उतार आले, संघर्ष आले; मात्र तुम्ही कधीच माझी साथ सोडली नाही. माझ्या प्रत्येक यशात तुमचा वाटा आहे,” असे ते म्हणाले.

कोरोनाच्या अत्यंत कठीण काळातही हा उपक्रम बंद पडू दिला नाही, असे सांगताना दगडे पाटील म्हणाले, “माझ्या कुटुंबातील प्रत्येक घरात दिवाळीचा आनंदाचा दिवा पेटला पाहिजे, हीच या उपक्रमामागची भावना आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात माता-भगिनींनी मला खंबीर साथ दिली. निवडणुकीच्या काळात मला फारसे फिरण्याची गरज पडली नाही, कारण याच माता-भगिनींनी घरोघरी जाऊन माझा प्रचार केला.”

बावधनमध्ये अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात आले असून, आता भुसारी कॉलनीमध्येही नवीन क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे दगडे पाटील यांनी सांगितले. चांदणी चौकात तीन एकर जागेत क्रीडा संकुल उभारण्याचे काम सुरू असून टेनिस कोर्टही तयार करण्यात आले आहे. चांदणी चौक उड्डाणपूल, पाण्याचे प्रश्न, अग्निशामक केंद्र यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या निमित्ताने हजारो कुटुंबांच्या घरात आनंदाचा दिवा पोहोचविणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Img 20261031 wa0190
Fb img 17931033768477166369956517137623
Img 20261031 wa0125

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये