पुणे शहर

पुणेकरांनो अखेर मुहूर्त ठरला! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो मार्गिका ३) या २३.३ किलोमीटरच्या मेट्रो लाईनच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. आगामी ३ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मेट्रो मार्गिकेचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे.

Addaheading 20261008 091048 0001

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Fb img 17931033768472930626883582264824

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ तत्त्वावर उभारण्यात आलेली ही मार्गिका पुण्याची ओळख असलेल्या हिंजवडी आयटी पार्कला थेट शहराच्या मध्यवर्ती भागाशी (शिवाजीनगर) जोडणार आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर या भागांतील लाखो नोकरदार आणि प्रवाशांचा रोजचा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये