पुणे शहर

येरवड्यात महामंगल वर्षावास कार्यक्रमाची सांगता

रमामाता महिला मंडळाने केले होते आयोजन

पुणे : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत बौद्ध धर्मातील पवित्र महामंगल वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी येथे करण्यात आले होते. रमामाता महिला मंडळ व सिद्धार्थ मंडळ यांच्या वतीने या कालावधीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे तीन महिने वाचन करण्यात आले.

Addaheading 20261008 091048 0001

बौद्ध धर्मगुरू पूज्य भंते धम्मानंद महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता समारंभ झाला. बुद्ध वंदना तसेच वर्षावास कालावधीतील अनुभवांचे कथन यावेळी सहभागी लहान बालकांसह महिला कार्यकर्त्यांनी केले. यावेळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच अखिल भारतीय भिक्कू संघ यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

Image editor output image 576031293 1792938342359

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या शारदाताई ओव्हाळ, माजी आमदार सुनील टिंगरे, नगरसेवक सुहास टिंगरे, रवी टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमामाता महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सरस्वती जगताप होत्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश शिंदे, सेक्रेटरी विलास कांबळे, संचालक विलास कदम, रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीला कदम, सेक्रेटरी रेखा चव्हाण मंडळाचे उपाध्यक्ष अजय गडकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नमिता जाधव यांनी तर प्रास्ताविक सुमन बहुले यांनी केले. महामंगल वर्षावास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमामाता महिला मंडळ, सिद्धार्थ मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी ट्रस्ट यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे बहुमत सहकार्य लाभले.

Image editor output image 575107772 1792938554948
कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिक

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये