पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय ; पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील – अजित पवार

पुणे : लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे पुण्यात लहान मुलांसाठी रुग्णालय राखीव करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले A hospital reserved for children in Pune; The decision on lockdown in Pune will be taken by the Chief Minister – Ajit Pawar
भारतात तयार झालेल्या कोरोना लसी बाहेरच्या देशांना अगोदर द्यायला नको होत्या. रशियाने त्यांचं झाल्यावर लस दिली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. इतकंच नाही तर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना फोन लावला होता, ते अजून तरी दहा बारा दिवस इथं येणार नाहीत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. लहान मुलांना पुण्यातील राजीव गांधी रुग्णालय राखीव करतोय. सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.
पुण्यातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री बोलतील
पुण्यातील लॉकडाऊनबाबत मी तसा सूतोवाच केला आहे. अनेक नेत्यांचंदेखील मत आहे. पोलिसांशी आम्ही बोललो त्यांच्या अडचणी आहेत. सध्या हायकोर्टाने सूचना केल्या आहेत. पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. कारण नसताना फिरणाऱ्या लोकाची संख्या कमी झाली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.



