पुणे शहर

लस संपल्याने घरी परतलेल्यांना  लसीकरण झाल्याचा मेसेज..पुण्यातील ज्येष्ठांचा अनुभव ; तांत्रिक बिघाडामुळे मनस्ताप

पुणे : पुण्यात काही ठिकाणी लसीसाठी ॲपवरुन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे लस संपल्याचे सांगितले गेले. असे नागरिक घरी आल्यावर त्यांच्या आप्तेष्टांना संबंधितांचे लसीकरण (coronavaccine)झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. अशा  प्रकारांमुळे सामान्य नागरिकांची ससेहोलपट होत असून प्रशासनाने असे प्रकार रोखवेत व ॲप मधे काही तांत्रिक दोष असल्यास त्याबाबत आवश्यक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अतुल भिडे यांनी त्यांचे वडील (वय 88) आई (वय 86) व सासरे वय (88) यांच्यासाठी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट नऱ्हे सिंहगड कॉलेज येथे 30 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 1 अशी मिळाली.

अतुल भिडे तिघांनाही घेऊन पावणे अकरा वाजता पोहोचले तेव्हा तेथे प्रचंड गर्दी होती. तेथील अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट पत्रही दाखवले परंतु त्यांनी सांगितले की तुम्हाला रांगेतच यावे लागेल वेगळी सोय नाही. रांगेतील लोक सकाळी सहापासून उभे आहेत. अतुल भिडे नाईलाजास्तव रांगेत उभा राहिले परंतु थोड्याच वेळात लस संपल्याचे जाहीर करण्यात आले त्यामुळे भिडे तिन्ही वृद्ध लोकांना घेऊन घरी आले.

IMG 20210430 WA0001

अतुल भिडे यांनी घरी येऊन कोविनॲप उघडून पाहिले तेव्हा असे दिसले की या तीनही लोकांच्या नावावर लस दिल्याचा दाखला दिसत होता. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे दुसऱ्या डोससाठी अपॉइंटमेंट घेता येणे शक्य नाही.

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी अतुल भिडे यांचा हा अनुभव जाहीर कार्यक्रमात सांगितला. प्रशासनाने आजवर आलेल्या लसी व त्यांचे एकूण सर्वच केंद्रावर झालेल्या वाटपाचा तपशील जाहीर करावा अशी मागणी करुन प्राप्त लसींचे सर्व केंद्रावर समान वाटप केले जावे व ज्यांनी अॅप वर अपॉइंटमेंट घेतली आहे अशांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये