पुणे शहर

भाजपच्या महीला नेत्याकडून लसीकरण केंद्रावर चाळीस नागरिकांना नोंदणी न करता प्रवेश ; कोथरूडमधील गांधीभवन केंद्रावर गोंधळ

पुणे : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून दबाव येत असल्याच्या तक्रारी पुणे शहरात दररोज येत असतानाच कोथरूडमधील गांधीभवनमधील लसीकरण केंद्रावर भाजपच्या एका महिला नेत्यांनी सुमारे चाळीस नागरीकांना नोंदणी न करता प्रवेश मिळवून दिल्याने आज (शुक्रवारी) मोठा गोंधळ झाला. यामुळे काही काळ लसीकरण थांबविण्यात आल्याने नोंदणी केलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.(Forty unregistered citizens admitted to the vaccination center by a BJP woman leader; Confusion at Gandhi Bhavan Center)

IMG 20210430 WA0001

‘ज्याचा वशिला त्याचे कुत्र काशीला’ या म्हणीचा प्रत्यय पुणे शहरातील लसीकरण केंद्रावर दररोजच पाहायला मिळत आहे. कोविन ॲप द्वारे नोंदणी करून नागरीक लसीकरण करण्यासाठी केंद्रांवर येतात. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्याकडून नोंदणी न करता आलेल्या नागरिकांना केंद्रामध्ये प्रवेश मिळवून देऊन लसीकरण केले जात आहे.
अशाप्रकारे अधिकाऱ्यांवर दबाव टाकून लसीकरण करून घेणाऱ्या भाजपच्या महीला नेत्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पुणे महापालिका आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

IMG 20210507 WA0009

कोथरूड भागातील गांधीभवन मधील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी सकाळी भाजपच्या एका महिला नेत्यांनी सुमारे चाळीस नागरिकांना लसीकरण केंद्रामध्ये प्रवेश मिळवून दिला. यावेळी केंद्रावरील वॉचमन ने नागरिकांना नोंदणी केली नसल्याने मनाई केली असता, काही नागरिकांनी शिवीगाळ करत भाजपच्या नेत्यांचे नाव सांगत केंद्रामध्ये प्रवेश केला. त्यामूळे याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत जाब विचारला त्या वेळी नोंदणी केलेल्या नागरिकांना च आज लसीकरण करण्यात येईल. तसेच आज लसीकरण न झालेल्या नागरिकांना पुढील तारीख देण्यात आली. आणि लसीकरणास सुरूवात झाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये