युवादिनानिमित्त विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या युवकांचा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सन्मान.

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पुणे शहर सरचिटणीस गिरीश गुरूनानी यांच्या संकल्पनेतून स्वामी विवेकानंद जयंती व त्या निमित्त साजरा केला जाणारा राष्ट्रीय युवादिना निमीत्त आज कोथरूड क्षेत्रातील होतकरू युवकांचा सन्मान करण्यात आला. याच अनुषंगाने कोरोना काळात लक्ष्यवेधी कामगिरी व अतोनात कष्ट करून समाजाची सेवा केलेले तरुण तरुणी डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांना भेटून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सन्मान चिन्ह व शाल नारळ देऊन आभार व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कोथरूड चे राष्ट्रवादीचे गिरीश गुरूनानी यांनी केले होते. युवा शक्ती चा सन्मान करून त्यांच्या कर्तुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आल्याचे यावेळी गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कोरोना ला लढा देण्यात युवकांचा लक्षणीय वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. अश्या कर्तव्यनिष्ठ युवकांच्या हातात आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित व उज्वल असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या सन्मान प्रदर्शनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव सनी मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुळशी तालुकाचे कार्याध्यक्ष, प्रवीण धनवे, राष्ट्रवादी चित्रपट सेनेचे सरचिटणीस संकेत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभेचे उपाध्यक्ष अमोल गायकवाड, रवी गाडे, संदेश कोतकर इत्यादी उपस्थित होते.



कोथरूड येथील सुतार दवाखान्यातील कोरोना चाचणी केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सुमित चव्हाण, डॉ. तेजस शहा, कु. काजल कांबळे, जयंत चव्हाण, आकाश म्हेत्रे, ओमकार गुळूमकर, राहुल खुडे तसेच आशिष गार्डन जवळील चव्हाण क्लिनिक येथे रुग्णसेवेत रुजू असलेले डॉ. विकास चव्हाण यांचा युवा सन्मानाने गौरव करण्यात आला. व कोथरूड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे युवा पोलीस कर्मी अनिस लतिफ तांबोळी, संदीप बाबुराव शेळके, नितीन राजाराम जगदाळे, अमीर मजिदुल्ला पटेल, महेंद्र माधव उईके यांनी ही या युवा सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.
या सर्व युवांच्या कर्तृत्वाचे गौरव करून त्यांचे कोथरूड वासीयांच्या वतीने राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.



