कवी राजेंद्र वाघ यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान..

पुणे : खान्देश साहित्य संघ सुरत, गुजरात व मानवता बहुउद्देशीय धुळे, संस्थेच्या वतीने देण्यात येणारा साहित्य भूषण पुरस्कार साहित्यिक, कवी राजेंद्र वाघ यांना डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सुरत येथील आंबेडकर भवनात आयोजित भव्य आंतरराज्य काव्य संमेलनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन विजया मानमोडे यांच्या हस्ते झाले. तर अध्यक्षपद प्रा. रत्ना पाटील यांनी भूषविले.
यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे, युवा नेता कुणाल सोनवणे, कविसंमेलन अध्यक्षपदी डॉ. नरेंद्र खैरनार यांच्या उपस्थित कवींचे कविसंमेलन यशस्वीपणे पार पडले. यात राजेंद्र वाघ यांच्या कवितेने उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र बहारे यांनी केले, सूत्रसंचालन किरण वानखेडे आणि मीनाक्षी जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र बहारे यांनी मानले.









