पुणे शहर

महात्मा फुले आणि महामानव डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेने हे वर्ष सामाजिक सुधारणांचे वर्ष ठरावे : उपमहापौर परशुराम वाडेकर

लोककला दर्शन’ कार्यक्रमाने संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप*

पुणे : यंदाचे वर्ष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मद्वीशताब्दी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन हे वर्ष सामाजिक सुधारणांचे वर्ष ठरावे, अशी अपेक्षा उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या समारोप प्रसंगी वाडेकर बोलत होते.

Img 20260222 wa00064690128680200836049



औंध बोपोडी परिसरातील महापालिकेच्या खेडेकर रुग्णालयात डायलिसिस, फिजिओथेरपी, मुलांसाठी आयसीयू अशा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज झाले असून आगामी काळात शेवाळे रुग्णालयात कर्करोग आणि दंत रोगावर उपचारांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे संजय गांधी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा डाव उधळून लावला गेला असून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या माध्यमातून या रुग्णालयाचे देखील आधुनिकीकरण केले जाणार आहे, अशी घोषणा आहे वाडेकर यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमात डॉ. झिब्रा इस्रायल यांचा त्यांच्या सामाजिक कार्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. औंध बोपोडी परिसरातील महापालिका रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात डॉ. इस्रायल यांचे मोलाचे योगदान आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाउनच्या त्या असिस्टंट गव्हर्नर असून या माध्यमातून देखील त्यांनी केवळ औंध बोपोडी परिसरातच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आपल्या कार्यामध्ये माजी उपमहापौर सुनीता वाडेकर व विद्यमान उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे मोलाचे सहकार्य असून या पुढील काळातही समाजासाठी योगदान देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे डॉ. इस्राएल यांनी यावेळी नमूद केले.

महोत्सवाच्या समारोपानिमित्त “लोककला दर्शन” या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाकरी गीत, पोतराज, शेतकरी गीत, भारुड,, लावणी, शाहिरी, भीम किर्तीचा पोवाडा, जागरण गोंधळ अशा विविध लोककलांचे दर्शन कलाकारांनी प्रभावीरीत्या घडवले. रसिकांनी या कलांचा मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये