पुणे शहर

पडद्यामागचे कलाकार ही अभिनयात अव्वल ‘गेम ऑफ पॉवर’ नाटकातून पुणेकर नाट्य रसिकांना आला अनुभव..

राज्य हौशी नाट्य स्पर्धेत पडद्यामागच्या कलाकारांनी जिंकली रसिकांची मने

पुणे : पडद्यामागचे हात ही अभिनयात कुठे कमी नाहीत याचा अनुभव ‘ गेम ऑफ पॉवर ‘ नाटकाच्या निमित्ताने पुण्यात नाट्य रसिकांना अनुभवता आला. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत पडद्यामागे राहून नाटक उभं करणाऱ्या कलाकारांनी जेव्हा आपला अभिनय सादर केला तेव्हा त्यांच्या अभिनयाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाली. सध्यस्थितीच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या या विनोदी नाटकाने रसिकांची मने जिंकली.

Untitleddesign 20231215 130053 00003059758597790371888

पडद्यामागे राहून नाटक उभं करण्यासाठी अनेक हात झटत असतात. या झटणाऱ्या हातांचे मोठे कलाकारही नेहमीच आभार मानत असतात, कारण त्यांच्यामुळे नाटक सादर होत. परंतु नाट्य स्पर्धेत पडद्यामागच्या हातांनी म्हणजेच नाटकाचे निर्माते, व्यवस्थापक, वितरक, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार यांनी जेव्हा रंगमंचावर ‘गेम ऑफ पावर’ नाटक सादर केलं, तेव्हा त्यांच्या अभिनय कौशल्याचे कसलेल्या नाट्य कलाकारांनीही कौतुक केले.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

एरवी स्पर्धेच्या नाटकाला एवढी गर्दी होत नाही पण हे नाटक पाहण्यासाठी भरत नाट्य मंदिर प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. प्रेक्षक एवढे वाढले की, बाल्कनी ही ओपन करायला लागली. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञांनी सादर केलेल्या गेम ऑफ पॉवर या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनात अभिनय करताना धाकधूक असतानाही सर्वच कलाकारांनी चांगलच बेरींग पकडल्याचे पाहिला मिळाले. सद्य राजकीय परिस्थतीवर आधारित असलेले हे नाटक विनोदी ढंगात सादर झाल्याने रसिकांना ते जास्त भावले.

राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६२ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे पुणे केंद्र असलेल्या भरत नाट्य मंदिरात प्राथमिक फेरीत हे नाटक सादर झाले.

पुण्यातील रंगभूमी सेवक संघाचे आनंद जोशी द पवार गेम हे नाटक दिग्दर्शित केले होते. नाट्य व्यवस्थापक समीर हंपी, सत्यजित धांडेकर, सुरेश जोग, अश्विनी थोरात, मेधा फाटक, प्राची ठाकूर, सुधांशू पानसे आदींनी नाटकात काम केले.

Img 20230717 wa0012281294586790481769091554

नाट्य व्यवस्थापक सत्यजित धांडेकर म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आमचे अभिनय कौशल्य दाखवू शकलो. नाटक उभ राहत असताना ते सादर होत असताना पडद्यामागे अनेक हात राबत असतात. त्यातील अनेकांना आपण एकदा तरी नाटकात काम करावे अशी सुप्त इच्छा असते. ही इच्छा आज पूर्ण झाली. नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद जोशी यांनी सर्व टीमकडून मेहनत करून घेतली. नाटक झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकामुळे मेहनतीचे चीज झाले आहे असे वाटत आहे.

Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये