पुण्यातील पाणी कपातीचा निर्णय “या” तारखे पर्यंत स्थगित; महापौर मंजुषा नागपुरे यांचा निर्णय

पुणे : पुणे शहरात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उद्यापासून जाहीर केलेली पाणी कपातीचा निर्णय शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी 24 तासाच्या आत रद्द केला आहे. त्यामुळे पुढील निर्णया पर्यंत शहरातील पाणीकपात रद्द होणार आहे.
पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पालिकेतील नेतृत्वात सुप्त संघर्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात पालखी सोहळा पुण्यात आगमन होणार असल्याने शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्यात आली होती. यानंतर 1 जुलै ते 8 जुलै रोजी धरणाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय रद्द होईल अशी अपेक्षा असताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उद्यापासून ( ता. 15) पाणी कपातीचा निर्णय घेतला होता.

मात्र पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी हा निर्णय रद्द करीत 22 जुलै पर्यंत पाणी कपातीचा निर्णय स्थगित केला आहे



