पुणे शहर
पुणे शहरातील ज्येष्ठ बौद्धाचार्य अशोक साळवी यांचे निधन

पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध धम्माचे अभ्यासक अशोक गंगाधर साळवी (वय 77) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
संरक्षण विभागाच्या खडकी येथील सीएएफव्हीडी या ठिकाणी कामगार नेते म्हणून देखील त्यांनी काम केलेले होते. सीएएफव्हीडी कार्यालयाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीमध्ये त्यांचा सहभाग होता. येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, सिद्धार्थ मंडळ तसेच भिम सेवा समाज लष्कर (कॅम्प) या ठिकाणी विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.




