सोमवार की घातवार.. रस्त्यावरील अपघात एक चिंतन ; आपली गाडी आपली जबाबदारी – डाॅ.सचिन नागापूरकर अस्थीरोग तज्ञ ,पुणे

आज पुणे परिसरातील नवले पूल परिसरात अपघात झाला…गेल्या दोन महिन्यातील हा बहूदा तिसरा चौथा अपघात आहे . अत्यंत वाईट घटना.
दरवर्षी न चुकता आपण सरकारी पातळीवर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतो….Flex लावणे,निबंध स्पर्धा घेतो…भाषणे ठेवतो पण प्रत्यक्षात मात्र आपण सर्व..सरकार सोबत रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी कमी पडतो हे नक्की.
मी अस्थीरोग तज्ञ म्हणून काम करत असताना रस्त्यावरील अपघातात जखमी झालेले रूग्ण बघतो…काही जणांची स्वतःची चूक असते तर काही जण दुसर्याच्या चुकीचे शिकार होतात.भारतात दरवर्षी किमान 1 ते 2 लाख लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात तर लाखो लोक अपंग होतात…रुग्णांचे अस्थिभंग होतात. खूप आर्थिक नुकसान होते.
आपण भारतीय आज कोरोना संसंर्ग आजारावर मात करत आहोत पण रस्त्यावरील अपघाताबाबात …आजही आपण फारसे प्रभावी पद्धतीने काम करताना दिसत नाही आहोत.

सिंहासन News नवले पुलाजवळ भीषण अपघात ; ३ जण ठार https://www.sinhasannews.com/terrible-accident-near-navale-bridge-3-killed-7822/
कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर… रस्त्यांवरील अपघाताचे मुख्य कारण म्हणजे .. रस्ता व्यवस्थित नसणे
रस्ता व्यवस्थित नसणे….रस्त्यांवरील खड्डे …निकृष्ट दर्जाच्या मटेरियलचा वापर, नियमित डागडूजी नसणे, रस्त्यावरील अतिक्रमणे, रस्त्यावरील Blind Turns ,अपूरा प्रकाश, रस्त्यावरील कामे सुरू असताना होणारा विलंब….कामातील दिरंगाई…खरच खूप वाईट वाटत.
सरकार कोणाचे, रस्ता राज्य सरकारचा की केंद्र सरकारचा की ग्रामपंचायतीचा की मनपाचा की नगरपालिकेचा वाद निर्माण होतो….अपघात झाला की दोन दिवस चर्चा होते….नंतर सगळे शांत….सगळे तात्पुरते….मृत्यूमुखी पडलेल्या रूग्ण नातेवाईकांना मदत…परत शांत..
तसेच रस्त्यावरील अपघाताबाबत आहे.
कायम स्वरूपी उपाययोजना नाही. खर तर मला असे वाटत की केंद्रीय पातळीवर जसे निवडणूक आयोग काम करते त्या नुसार एक केंद्रीय पातळीवर रस्ता आयोग पाहीजे . हा रस्ते आयोग स्वायत्त संस्थेनुसार काम करेल…भारतात कोठेही रस्ता बनवायचा असेल तर तो रस्ता आयोगाच्या नियमानुसार.,त्यांच्या कायद्यानुसार… सर्व नियम पाळून….आंतरराष्ट्रीय स्तरावरील मापदंडकानुसार होईल..
जर संपूर्ण भारतात एकच चलन चालते…भारतीय घटना एकच आहे….संपूर्ण देशात कायदे सारखे आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वोच्च मानला जातो तर मग रस्त्याच्या बाबतीत वेगळे नियम का ? राष्ट्रीय महामार्ग चांगला…टोल रोड मस्त…टोल संपला की परत रोड खराब….शहरातील रोड व्यवस्थित तर ग्रामीण भागातील रस्ते खराब…का..ग्रामीण भागात माणसे रहात नाहीत का? की यांना त्रास वेदना होत नाहीत?



रस्ते म्हणजे शरीरातील रक्तवाहिण्या आहेत…त्या व्यवस्थित असल्याच पाहीजेत.
आपल्या कडे रस्त्यावरील कामासाठी काही कमी पैसे खर्च होतात असे नाही…भरपूर सरकारी पैसे खर्च होऊन देखील. ..निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात कधीतरी चिंतन होणार आहे की नाही? आज कोणालाही विचारले अरे…मी फिरायला अमूक ठिकाणी जाणार आहे…तर लगेच चार- पाच जणं सांगतात..ठीकाण चांगले आहे पण एक काम कर ह्या रस्त्याने जा..त्या नको..तो खराब आहे..खूप वेळ लागेल….इतके नियमित झाले आहे रस्ते खराब असणे…..
अपघाताचे दुसरे कारण…आपण सर्व सामान्य माणंस..
वाहतुकीचे नियम न पाळणे, दारू सेवन करून गाडी चालवणे, जास्त लोक एकत्र येऊन प्रवास करणे, गाडीची नियमित सर्विसिंग न करणे, वयोमानानुसार डोळ्यांची तपासणी न करणे, दिवसभर तसेच रात्री आराम न करता गाडी चालवणे…
कारणे काहीही असो पण अपघातात मृत झालेले रूग्ण बघताना अथवा अपघातात गंभीर जखमी अवस्थेत आलेले रूग्ण, अपघातात डोक्याला, मनक्याला, हाडांना मार लागून आलेले अपंगत्व खरच खुप वाईट वाटत. तरूण रुग्ण, घरातील करता कमवता माणूस अपघातात मृत्यूमुखी पडलेला बघून वाईट वाटत. आपण सर्वांनी रस्त्यावरील अपघात कसे कमी होतील ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. एक राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वर्षभर प्रयत्न केले पाहिजेत.
डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग व अपघात तज्ञ,पुणे



