पुणे शहर
नवले पुलाजवळ भीषण अपघात ; ३ जण ठार

पुणे : मुंबई बेंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात भरधाव आलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात ८ ते १० जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून सातार्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक ने नवले पुलाजवळ दुचाकीस्वाराला धडक देत रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्यांना उडवले आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या लोकांच्या ट्रकने उडवल्याने केल गोंधळ उडाला होता. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.





One Comment