गुरुवारी पुण्यातील “या” भागातील पाणी पुरवठा बंद राहणार..

पुणे : दुरुस्तीच्या कामासाठी गुरूवार दिनांक ०४/०६/ २०२६ पुणे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
गोखलेनगर मॅपको टाकीच्या मुख्य जलवाहिनीला जोडणी करणेकरिता उपरोक्त टाकीच्या अखत्यारीतील येणाऱ्या परिसरातील पूर्ण १ दिवसाचा पाणीपुरवठा सदर दिवशी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०५/०६/२०२६ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.) : गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्रीकॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने
सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूसंचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी.
चतु:श्रृंगी टाकी परीसर :- औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी,
खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर,
अभिमानाश्रीसोसायटी, नॅशनल, सिंधसोसायटी, औंधगाव परिसर.



