पुणे शहर

महाराष्ट्राच्या महिला कुस्तीगीर भाग्यश्री कोळी हिची देशासाठी सुवर्ण भरारी; एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक

पुणे: व्हिएतनाम येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी महिला पैलवान भाग्यश्री मंगेश कोळी यांनी सुवर्णपदक पटकावून भारतासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली.

व्हीएतनाम येथे झालेल्या U23 asian championship 2026 या स्पर्धेत भारताच्या भाग्यश्री कोळी हिने दिमाखदार कुस्त्या करीत 62 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत भाग्यश्रीने कझाकस्तानच्या टायनिस हीचा 4-0 असा पराभव करीत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले.

Img 20251125 wa01783213374507166536090



उपांत्य फेरित भाग्यश्रीने किर्गिस्तानच्या कलगिरि बिलीमबेक किझी हिला 12-2 या मोठ्या फरकाने मात देत अंतिम धड़क दिली.याच गटातील दुसऱ्या उपांत्य फेरित कझाकस्तानच्या टायनिस डुबेक हिने उझेबकिस्तानच्या कुशमुरातोव्हा हिला 18-7 अश्या फरकाने पराभूत केले तसेच कस्यपदकाच्या लढतीत उझेबेकिस्तानच्या मियासार कुशमुरातोव्हा हिने किर्गिस्तानच्या कालमिरा बिलिम किझी हीचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला .

पै भाग्यश्री मंगेश कोळी ही मूळ कात्रज पुणे येथील असून कुस्तीच्या सरावासाठी रोहतक हरियाणा या ठिकाणी असते. तिला पि.एन मंदीप सर याचे मार्गदर्शन लाभले आहे. तिचे पुढचे धेय ऑलम्पिक 2028 हें आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये