सेवेची ११ वर्षे… आनंदाची दिवाळी प्रत्येक घरात ! नगरसेवक किरण दगडे पाटील यांचा प्रभागातील नागरिकांसाठी अनोखा उपक्रम

१ नोव्हेंबरला अमृता फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
पुणे : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण… घराघरात पणत्या उजळाव्यात, प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे आणि सणाचा गोडवा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा, या भावनेतून कोथरूड-बावधन परिसरात यंदाही जनसेवेचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक १०, कोथरूड-बावधनमधील नागरिकांसाठी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने भव्य मोफत दिवाळी किराणा साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तब्बल ११ वर्षांपासून सुरू असलेली ही जनसेवेची परंपरा यंदाही तितक्याच उत्साहाने पुढे नेण्यात येत आहे.

दिवाळीचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता यावा, सणाच्या दिवसांत कोणत्याही कुटुंबावर आर्थिक ताण येऊ नये आणि प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा गोडवा पोहोचावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जीवनावश्यक किराणा साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, पी.एम.पी.एम.एल. मैदान, शांतिबन चौक, कोथरूड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृताताई देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.



‘सेवेचा संकल्प, माणुसकीची बांधिलकी आणि आनंद वाटण्याची परंपरा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून केवळ किराणा साहित्याचे वाटप होणार नसून, समाजातील प्रत्येक घटकासोबत दिवाळीचा आनंद वाटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गेल्या ११ वर्षांपासून नगरसेवक किरण दगडे पाटील राबवत असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आला असून, यंदाही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दिवाळीच्या निमित्ताने समाजातील गरजू कुटुंबांच्या घरातही आनंदाची पणती तेवावी, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटावे आणि ‘आपण एकटे नाही, समाज आपल्या सोबत आहे’ हा विश्वास निर्माण व्हावा, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीचा सण हा केवळ रोषणाई आणि फराळाचा नसून, एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा आणि माणुसकी जपण्याचा सण आहे, याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभागातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे.
दिवाळीचा सण हा केवळ रोषणाई आणि फराळाचा नसून, एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा आणि माणुसकी जपण्याचा सण आहे, याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभागातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे.












