पुणे शहर

ज्यांच्या श्रमामुळे परिसर स्वच्छ… त्यांच्या घरीही पोहोचला दिवाळीचा आनंद!

नगरसेवक हर्षवर्धन मानकरांचा कौतुकास्पद उपक्रम 

पुणे : वर्षभर ऊन, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा प्रयत्न दिवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला.

रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील महापालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सरंजाम व इतर भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. नगरसेवक तथा दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Img 20260222 wa0006893553232066122087

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण. मात्र, आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असताना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक स्वच्छता कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. नागरिकांच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला जातो.

Fb img 1793293120824

यावेळी बोलताना हर्षवर्धन मानकर म्हणाले, “वर्षभर आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हे कर्मचारी अत्यंत मेहनत घेत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी दिवाळीत भेटवस्तू देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच या उपक्रमाची खरी कमाई आहे.”

गेली जवळपास नऊ वर्षे दिवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे, याचा अभिमान असल्याचेही मानकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “आपल्या शहराची स्वच्छता राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेता यावा, एवढाच या उपक्रमामागचा साधा आणि मनापासूनचा हेतू आहे. त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवणे आणि सणाच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”

Fb img 1793293068166

स्वच्छता कर्मचारी हे शहराच्या व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. नागरिकांच्या नजरेआड राहून ते दररोज आपले काम प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यांच्या श्रमामुळे परिसर स्वच्छ राहतो, नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळते आणि शहराची स्वच्छता व्यवस्था सुरळीत राहते. त्यामुळे त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत वाटून घेण्याचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला.

यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. “सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा प्रकाश आणि आनंद कायम राहो,” अशी सदिच्छा हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये