पुणे शहर

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेसाठी जन्मतारखेच्या दाखल्याची गरज नाही.राज्य शासनाचा निर्णय-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठपुराव्याला यश

विधिमंडळात मांडला होता प्रश्न

पुणे : राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना याकरीता जन्म तारखेच्या दाखल्याची आता गरज नाही, असा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ग्रामीण भागातील तसेच शहरातही काही भागातील  बाळांचे जन्म दवाखान्याऐवजी घरीच होतात. त्यामुळे त्यांच्या जन्मतारखेचा दाखला मिळू शकत नाही. या कारणाने अनेकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांचे लाभ घेता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आमदार शिरोळे यांनी विधीमंडळ अधिवेशनात मांडली होती आणि त्यासाठी पाठपुरावाही केला, त्याला यश आले. आता यापुढें आधारकार्डवरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल, असा निर्णय घेतला असून राज्य सरकारने तसा जीआर काढला आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

Img 20261029 wa00153082406691295416280

या दोन्ही योजनांसाठी जन्मतारखेच्या दाखल्याची अट काढून टाकल्याने या योजनेचा लाभ घेणे अनेकांना सोपे होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.

Fb img 17931033768477166369956517137623

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये