पुणे शहर

खराडी मध्ये जैनेश्वरी दीक्षा महोत्सव उत्साहात संपन्न

त्याग, तपस्या आणि संयमाचा त्रिवेणी संगम!

पुणे : खराडी येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आयोजित “जिनधर्म आराधना चातुर्मास २०२६” अंतर्गत,
“त्याग, तपस्या आणि संयम या त्रिवेणी संगमातून जिनधर्माच्या मंगलमय संस्कारांचा संदेश देणारा  २४ ते २६ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसीय भव्य “जैनेश्वरी दीक्षा महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.”

Img 20261027 wa0134

खराडी च्या तुळजाभवानी नगर येथील ग्रँड रोड वरील मैफिल्ड इवा गार्डन च्या भव्य प्रांगणात उभारण्यात आलेला अति भव्य विशाल मंडप व त्यावर करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई यामुळे जैनेश्वरी दीक्षा महोत्सव कार्यक्रम खराडी मध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

परमपूज्य मुनीश्री १०८ अजितसागरजी महाराज यांनी ऐलक श्री १०५ विवेकानंदसागरजी महाराज यांना जैनेश्वरी मुनीदीक्षा प्रदान करून मुनीश्री १०८ विदितसागरजी महाराज हे नामकरण केले. याच पवित्र प्रसंगी आदर्श भैया यांना ऐलकदीक्षा प्रदान करून ऐलक श्री १०५ विजितसागरजी महाराज हे नाव देण्यात आले.

या प्रसंगी खराडी येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या शिखर कलशाचा पुण्यार्जनाचा लाभ नील सिंघई यांना, तर ध्वजेचा पुण्यार्जनाचा लाभ अंकित मालवीय यांना प्राप्त झाला.

Img 20260222 wa00064513382578852640289



महोत्सवात श्रीजी अभिषेक, शांतिधारा, यागमंडळ विधान, शिखरशुद्धी, कलशारोहण, ध्वजारोहण आणि अन्य धार्मिक विधी श्रद्धापूर्वक पार पडले. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण खराडी परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित श्रावक-श्राविकांनी धार्मिक विधींमध्ये सहभागी होत जिनेंद्र भगवंतांचे दर्शन व आशीर्वाद घेतले.

Fb img 17931033768472930626883582264824



या भव्य धार्मिक सोहळ्याचे मार्गदर्शन प्रदीप भैया ‘सुयश’ यांनी केले. या सोहळ्याला वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेवक शैलेश बनसोडे तसेच खराडी जैन समाजाचे अध्यक्ष अभय जैन यांच्यासह अमित जैन, अरविंद जैन, प्रितेश जैन, मनीष जैन, मिलिंद फडे, शीतल लोहडे, सुमित जैन, विनय जैन, भरत संयोग, राजेंद्र जैन, भावेश जैन, स्वप्निल पाटनी, प्रीतम मेहता, रवी कासलीवाल, सुकमल जैन, देशभूषण डुड्डू, संतोष नेवाळे, अमित जैन, वीरेंद्र शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पुणे शहरातील ३० दिगंबर जैन मंदिरांचे ट्रस्टी, आगाज कमिटीचे पदाधिकारी आणि ५ हजार पेक्षा जास्त जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

जैन धर्मातील त्याग, तपस्या, संयम, अहिंसा आणि आत्मकल्याणाचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला. समाजातील धार्मिक संस्कार दृढ करणे आणि जैन समाजात एकता व बंधुभाव वाढविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला. सकल जैन समाज खराडी, पुणे यांच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय सोहळ्याला पुणे शहर तसेच महाराष्ट्र मधून आलेल्या दिगंबर जैन भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये