राष्ट्रीय

पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त.. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई..

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने जबरदस्त उत्तर दिलं आहे. भारताकडून बुधवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील  दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे.  भारताने बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील  दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत.  दरम्यान या हल्ल्यात काय काय नुकसान झालंय, याबाबत माहिती समजू शकलेली नाही.

भारतीय सैन्य दलाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ नुसार  ही कारवाई करण्यात आली आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भ्याड हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट होती. अखेर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत शेजाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत.

Screenshot 20250502 184418 instagram1538366923580944355

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये