महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या. या आरक्षणाच्या सुरुवातीच्या काळात नगरसेविका पत्नी आणि रुबाब पतिराजांचा असे महापालिकेतील वातावरण होते. नगरसेवक किंवा नगरसेविकेला प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी . ‘माननीय ‘ असे संबोधतात. नगरसेविकेच्या पतिराजांना ‘माननीय पती ‘ म्हटले जाते.
प्रारंभीच्या काळात अनेक महिला प्रथमच राजकारणात आणि तेही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. यातील निम्म्या तरी पतीच्या हट्टापायी उभ्या होत्या. राजकारणाचा गंध नसल्याने सारा कारभार पतिराजांच्या हाती होता. नवरा आणि नगरसेविका झालेली बायको जोडीनेच महापालिकेत यायचे आणि कामे आटोपून जायचे.
मंगळवार पेठेतील एका नगरसेविकेला काँग्रेसचे नेते एकही पद देईनात, कामे करायची तर याला भेटा, त्याला भेटा असे हेलपाटे घालायचे, यामुळे त्या नगरसेविकेचे पतीराजांच्या रागाचा महापौरांच्या दालनात अचानक स्फोट झाला. बरेच दिवस खदखदणारा राग असा काही उफाळून आला की त्यांनी अफाट शिवीगाळ चालू केली.पतिराजांचा तो आवेश पाहून तत्कालीन महापौरांसह काँग्रेसचे नेते अक्षरशः पळून गेले.
अलिकडे परिस्थिती बदलली आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशी पदे महिलांना मिळाली. बऱ्याच जणींमधील राजकीय जाणीव वाढली, आता पतिराजांची लुडबूड थांबली म्हणता येणार नाही पण कमी निश्चितच झाली आहे.
राजेंद्र पंढरपुरे, (जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक)
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
3 Comments