पुणे शहर
पुण्यात प्रदुषणाने गाठला उच्चांक

पुणे : दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने वायू प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक फटाके वाजवले जात असल्याने गेल्या तीन वर्षांमध्ये प्रदूषण आकडेवारीचा उच्चांक लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने नोंदवण्यात आला आहे.

सफर संस्थेने यावर्षी घेतलेल्या नोंदीनुसार दिवाळीतले पहिले दोन दिवस हवेतल्या अतिसूक्ष्म धुलिकणांच्या प्रमाणाची सरासरी ‘समाधानकारक हवा’ या श्रेणीत होती. मात्र रात्री १२ ते आज सकाळी ९ वाजेपर्यंत अतिसूक्ष्म कणांची पातळी २१० वर (Air Quality Index) पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही पातळी सरासरी ५० ते १०० इतकी होती. फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले गेल्याने प्रदूषण वाढले असल्याचे दिसून येत आहे.














































































