महाराष्ट्र

बिरसा मुंडा : क्रांतिकारी योद्धा

क्रांतिकारी लढवय्या भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य आणि त्यांच्या इतिहासातील कार्याविषयीची माहिती….

बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. तसेच भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी लढवय्या भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य आणि त्यांच्या इतिहासातील कार्याविषयीची ही माहिती….

Fb img 1794293187252
Img 20261110 wa0235



देशभरातील जनतेमध्ये आणि आदिवासींमध्ये भगवान म्हणून बिरसा मुंडा यांची पूजा केली जाते. आदिवासी विकास आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे लढवय्ये म्हणून त्यांना आपण सर्वजण ओळखतो. त्यांनी अल्प कालावधीत केलेल्या देशसेवा आणि अत्यंत उल्लेखनीय योगदानाबद्दल ते देशवासियांच्या कायम स्मरणात आहेत.

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातील तत्कालीन रांची आणि आजच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहातू गावात आदिवासी कुटुंबात झाला. बिरसांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी मुंडा होते. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. त्या काळात इंग्रजांकडून भारतीयांवर अत्याचार करण्यात येत होते. हे पाहून त्यांनी शालेय जीवनापासून इंग्रज सरकार विरोधात लढा उभारण्याचा निश्चय केला.

Img 20261110 wa0285


हक्कासाठी क्रांतिकारक लढा
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी, सध्याच्या झारखंडमधील उलिहातू गावातील बिरसा, हा तरूण मुलगा वसाहतवादी शोषणाविरुद्ध मोठ्या प्रमाणात प्रतिकार करणारा नायक बनला. जेव्हा ब्रिटीश अधिकारी आणि स्थानिक जमीनदार शोषण करीत होते, त्यांच्या जमिनी बळकावत होते आणि आदिवासी समुदायांवर अत्याचार करीत होते, तेव्हा भगवान बिरसा यांनी या सामाजिक आणि आर्थिक अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरित केले.

‘धरती आबा’ म्हणून आदरणीय असलेल्या भगवान बिरसा यांनी १८९० च्या दशकाच्या उत्तरार्धात ब्रिटीश दडपशाहीविरुद्ध ‘उलगुलान’ किंवा मुंडा बंडाचे नेतृत्व केले. इंग्रजांचा जनतेवरील अन्याय सहन न झाल्याने त्यांनी आयुष्यभर इंग्रजांविरोधात संघर्ष केला.

Fb img 1794291516457


उलगुलान हा निःसंशयपणे बंडखोरीपेक्षा अधिक तीव्र होता. ही लढाई न्याय आणि सांस्कृतिक ओळख या दोन्हींसाठी होती. बिरसा मुंडा यांच्या पुढाकारामुळे एकीकडे आदिवासींना कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या जमिनीवर मालकी मिळवण्याचा आणि शेती करण्याचा अधिकार मिळाला आणि दुसरीकडे आदिवासी चालीरीती आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व देखील एकत्र आणले. महात्मा गांधींप्रमाणेच त्यांचा संघर्षही न्याय आणि सत्याच्या शोधातून प्रेरित होता. आजारी लोकांची सेवा करणे हे बिरसा यांचे ध्येय होते. त्यांनी औषधोपचार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. यशस्वी उपचाराच्या अनेक घटनांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. त्यांनी लोकांना विनंती केली की, कोणत्याही आजारी व्यक्तीला त्यांच्याकडे घेऊन या, जर हे शक्य नसेल तर मी स्वतः आजारी लोकांना भेटायला येईन. ते गावोगावी जाऊन आजारी लोकांना भेटत असत आणि आपल्या कौशल्याने आणि आपल्या उपचाराने असंख्य लोकांना बरे करीत असत. दुष्काळ आणि महामारी आल्यानंतर जनतेचे प्रचंड हाल झाले. अशा काळात बिरसा मुंडा यांनी जनतेची खूप सेवा केली.

Img 20261110 wa0126
Fb img 17943028178201893105560870135925



दोन वर्षे तुरुंगवास
एकीकडे जनतेचे हाल होत होते, दुसरीकडे इंग्रजांचा जुलूम अशा स्थितीत बिरसा यांनी जनतेवरील कर माफीसाठी इंग्रजांविरुद्ध थेट आंदोलन सुरू केले. बिरसांची वाढती लोकप्रियता इंग्रजाच्या डोळ्यात खुपत होती. त्यांनी दडपशाहीचा वापर करून १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात पाठवले. बिरसा मुंडा येथील तुरुंगात सुमारे दोन वर्षे बंदिस्त राहिले.


पुढे १८९७ ते १९०० या काळात ब्रिटिश आणि मुंडा यांच्यात अनेक वेळा युद्धे झाली. बिरसा मुंडा आणि इंग्रज यांच्यात खुंटी येथे ऑगस्ट १८९७ मध्ये युद्ध झाले, बिरसा मुंडा आणि त्यांच्या सुमारे ४०० सहकाऱ्यांनी अत्यंत धैर्य दाखवित धनुष्यबाणांसह खुंटी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. १८९८ मध्ये टांगा नदीच्या काठावर मुंडांसह त्यांचे सहकारी आणि इंग्रज यांच्यात प्रचंड संघर्ष झाला. या लढाईत इंग्रज सैन्याचा मानहानीकारक पराभव झाला. परंतु इंग्रजांनी वचपा काढण्याकरिता अनेक आदिवासी नेत्यांना अटक करीत कारवाई करण्यास सुरुवात केली. यानंतर १९०० साली डोंबाडी टेकडीवर दुसरे युद्ध झाले. या लढ्यात अनेक महिलांसह निष्पाप अशा लहान मुलांचा मृत्यू झाला.

Fb img 1794291613984

रांचीमध्ये घेतला अखेरचा श्वास
बिरसा मुंडा यांनी युद्ध करून इंग्रजांना जेरीस आणले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९०० मध्ये इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथून अटक करून रांची तुरुंगात डांबले. येथेच ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू कॉलरामुळे झाल्याचे इंग्रज सरकारने सांगितले. मात्र, त्यावेळी कॉलराची कोणतीही लक्षणे दिसली नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. वयाच्या २५ व्या वर्षी मुंडा यांचा मृत्यू झाला.

Img 20261110 wa0238

भगवान बिरसा मुंडा यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्याला ‘बिरसाईच’ म्हणतात. आजही त्यांचे अनुयायी त्यांनी सांगितलेल्या विचारधारेप्रमाणे चालतात. बिरसा मुंडा यांनी संपूर्ण जीवन आदिवासी समाजाच्या विकासाकरीता वाहून घेतले होते. अत्याचाराविरोधात आक्रमकपणे लढा देताना त्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध बिगुल फुंकले.

Img 20251017 wa0416


बिरसा मुंडा हे पुरोगामी विचारवंत आणि सुधारणावादी नेते होते. त्यांनी आदिवासी समाजाला अंधश्रद्धा आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात जागरूक केले. प्राण्यांना मारणे योग्य नाही, त्यांचा बळी देणे चुकीचे आहे, असे त्यांचे मत होते. पशू-पक्षी यांच्याबाबत सहानुभूती असली पाहिजे, असे सांगून त्यांनी आदिवासींना दारू पिण्यास विरोध केला. बिरसा मुंडा यांनी समस्त आदिवासींचे संघटन करण्यावर भर दिला. झारखंड व्यतिरिक्त बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी भागातही बिरसा मुंडा यांची पूजा केली जाते. रांची येथील कोकर येथे बिरसा मुंडा यांची समाधी आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने ‘बिरसाईच’ लोक, अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तिथे जातात.

Img 20261110 wa0224

गौरव दिवस होणार साजरा
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन आणि पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून घोषित केला आहे. आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे योगदान, संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा आणि अस्मिता यांचे जतन व संवर्धन करून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Img 20261110 wa0233



बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण करण्याचे उद्दिष्ट दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या आदिवासी इतिहासाला भारताच्या इतिहासाच्या केंद्रस्थानी ठेवणे हे आहे. आदिवासी समाजाच्या अमूल्य योगदानाची ओळख होण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो. आदिवासी समाजाने क्रांतिकारी चळवळीतून इंग्रजाशी संघर्ष करताना सर्वोच्च बलिदान दिले. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध देशातील अनेक आदिवासी चळवळी राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या होत्या. त्यांनी देशभरातील भारतीयांना प्रेरित केले आहे.

Img 20261107 wa0004281295138413542248105918
Fb img 1794303450213 1
Img 20261031 wa0190


राज्यभर विशेष कार्यक्रम
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, विविध शासकीय सेवांचा लाभ सुलभ करणे तसेच त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यावर तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, सेवा वितरणावर विशेष भर देण्यात येणार आहे.

Img 20261110 wa0237
Img 20251022 wa0324


भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील गडचिरोली येथे देशस्तरावरील मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त राज्यातील सर्व जिल्हा आणि अनुसूचित जमातीबहुल तालुका मुख्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा तसेच अन्य आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात येणार आहे. पद्म पुरस्कारप्राप्त आदिवासी व्यक्ती, सामाजिक नायक, समाजसेवक, बुद्धिजीवी, आदिवासी संत-महंत तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व समूहांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदिवासी महापुरुषांच्या नावाने उद्याने, चौक आणि रस्त्यांचे नामकरण तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतनाचे उपक्रमही राबविण्यात येतील.

Img 20261106 wa0242



इतिहासातील भगवान बिरसा मुंडा आणि इतर अशा काही व्यक्तिमत्वांची नावे माहित नसायची. अलीकडच्या काळात मातृभूमीसाठी त्यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे अधिकाधिक लोकांकडून कौतुक केले जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात आपल्या संस्कृतीच्या आणि उपलब्धीच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी साजरी केली गेली. यामुळे देशवासियांना, विशेषत: तरुण पिढीला, अशा महान देशभक्तांच्या शौर्यपूर्ण योगदानाची जाणीव झाली. त्यामुळे भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्य आणि पराक्रमी नेतृत्वाची आठवण आजच्या नवीन पिढीला सदैव प्रेरणा देत राहील यात शंका नाही.
–००–
अनिल आलुरकर
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

10033824942592726420017943438
Img 20261108 wa00032551437689311826009
Img 20261108 wa01192784216726696966762
Addaheading 20261107 085150 0000
Img 20251020 wa0016282297746091081089016679
Addaheading 20261106 220105 0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये