पुणे शहर

कोथरूडमधील वस्ती विभागातील कुटुंबांसोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिवाळी

वस्ती भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद

कोथरूड  : दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध, नवे कपडे आणि आनंदाने उजळलेले चेहरे. मात्र, या आनंदाची खरी मजा तेव्हाच, जेव्हा तो इतरांच्याही आयुष्यात उजेड निर्माण करतो. हाच विचार मनात ठेवून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यंदाची दिवाळी कोथरुडमधील वस्ती भागातील कुटुंबांसोबत साजरी केली. त्यांच्या या अनोख्या दिवाळीने अनेक घरांमध्ये आनंदाची फुले उमलली, तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य या भेटीचे खरे समाधान ठरले.

Fb img 1794374467427


दिवाळीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील विविध वस्ती भागांना भेटी दिल्या. तेथील कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांना दिवाळीचा फराळ, लहान मुलांना खाऊ आणि खेळण्यांचे वाटप करण्यात आले. हातात नवी खेळणी मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक या दिवाळीचे खरे आकर्षण ठरले.

Fb img 1794383381473

या भेटी केवळ फराळ किंवा भेटवस्तूंच्या वाटपापुरत्या मर्यादित नव्हत्या. तर समाजातील प्रत्येक घटकाला सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा एक प्रेमळ प्रयत्न होता. रोजच्या धावपळीत आणि परिस्थितीच्या मर्यादांमध्ये सण साजरा करणाऱ्या कुटुंबांसाठी पाटील यांची ही भेट आपुलकीचा दिलासा देणारी ठरली.

Img 20261111 wa0201
Fb img 1794374301299

मात्र, या दिवाळीतील सर्वांत भावूक आणि प्रेरणादायी क्षण वेगळाच होता. दुष्काळग्रस्त भागातील गरजू बांधवांना मदत करण्यासाठी काही चिमुकल्यांनी आपापल्या पिगी बँक चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी साठवलेले पैसे दुसऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा या बालमनांचा निर्णय उपस्थितांची मने जिंकणारा ठरला.

Fb img 1794374367291

या चिमुकल्यांच्या मोठ्या मनाचे कौतुक करत चंद्रकांतदादांनी त्यांनी दिलेला पैसा योग्य ठिकाणीच खर्च केला जाईल, अशी ग्वाही दिली. या छोट्या हातांनी दिलेली मदत रकमेने कदाचित लहान असेल; पण त्यामागची भावना मात्र खूप मोठी आहे. स्वतःच्या आनंदापलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवण्याचा संस्कार या मुलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला.

Fb img 1794374262771
Fb img 1794374236081
Fb img 1794362647640 1
Screenshot 20261111 082349 instagram 1
Img 20261107 wa00041351533853315325461
Img 20251022 wa0324
Fb img 1794374280090
Img 20261111 wa0185
Img 20261108 wa00032551437689311826009
Img 20251017 wa0416
Fb img 1794374812064
Img 20261031 wa0190
Img 20261111 wa0203
Img 20261106 wa0242
Addaheading 20261107 085150 0000
Addaheading 20261106 220105 0000
Img 20261108 wa01192784216726696966762
Addaheading 20261012 112603 0001
Img 20251020 wa0016282297746091081089016679

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये