पुणे शहर

कोणताही दूजाभाव न करता वारजे कर्वेनगर मधील अतिक्रमणांवर कारवाई करा : शिवसेना, आरपीआय ची मागणी..

कर्वेनगर- कर्वेनगर वारजे भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून पौडफाटा ते उत्तमनगर पर्यंत अतिक्रमणचा सुळसुळाट झाला आहे, मात्र यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत कोणताही दूजाभाव न करता अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना व आर पी आय च्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखाध्यक्ष योगेश निंबरे व आरपीआय चे पुणे शहर उपाध्यक्ष सत्येश हिरवे यांच्या वतीने वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गर्रम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे हद्दीत रस्त्यांच्या कडेने अनेक ठिकाणी अतिक्रमणे वाढलेली दिसत आहेत. सिटी प्राईड रोड, कर्वे रस्ता व एनडीए रस्त्याच्या कडेने अतिक्रमणे वाढलेली दिसत आहेत, मात्र यावर काहीच कार्यवाही होताना दिसत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. लहान व्यावसायिकांवर कारवाई तर मोठ्या व्यावसायिकांना मात्र पाठीशी घालण्याचे काम अतिक्रमण विभाग करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्व रस्त्यावरील अतिक्रमण कोणताही दुजाभाव नकरता ताबडतोब काढून टाकण्यात यावेत अशी मागणी शिवसेना व आर पी आय पक्षाकडून करण्यात आली आहे.

Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये