इंदापुरचा पै गणेश खड़के ठरला कुमार कोथरुड केसरीचा मानकरी

कोथरूड: कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने कुमार कोथरुड केसरी स्पर्धा 2024 कोथरुड मधे पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी आयोजित केली होती. ह्या स्पर्धेसाठी पुणे जिल्हातून तब्बल 288 पेक्षा अधिक मल्लाचा सहभाग घेतला होता. त्यामध्ये महिलाच्या गटामधे महिला कुस्तीगीर सुद्धा सहभागी होते कुमार मल्ला बरोबरच महिलांनी देखील अटितटीच्या लढती केल्या.
मानाच्या कुमार कोथरुड केसरी किताबासाठी अंतिम सामना हा पै गणेश खड़के इंदापुर व् त्याच्याच सख्या भावाबरोबर पृथ्वीराज खड़के यांच्यामधे अटितटीच्या सामना झाला त्यामधे गणेश खड़के याने तुफानी कुस्ती करत विजय प्राप्त केला. एक किलो चांदीची गदा कुमार कोथरुड किताब आपल्या नावावर केला.महिलांच्या गटामधे पै आर्या बाणेकर हिने कुमार महिला कोथरुड किताब विजेता ठरली.

उद्धघाटन हर्षवर्धन मानकर यांनी केले. यावेळी पै गणेश मानगुडे,पै दिलीप नाना भरने यांनी मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण दीपाली डोख ,दीपाली गायकवाड़, कुंदा दत्तात्रय उभे,मंदा अनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानाची चांदीची गदा आमदार चंद्रकांत दादा पाटिल यांच्याकडून देण्यात आली होती. स्पर्धेचे आयोजक पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी केले होते.



कुमार मुले विजेते
32 किलो
प्रथम पै आदित्य शिरोळे
दृतिय पै नयन वाघ
35 किलो
प्रथम पै साई शितोळे
दृतिय पै रूद्र प्रताप साबळे
45 किलो
प्रथम पै सौरभ सोनवणे
दृतिय पै अथर्व तौर
47 किलो
प्रथम पै स्वराज माने
दृतिय पै पृथ्वीराज कारले
51 किलो
प्रथम पै शिवम् महाले
दृतिय पै प्रभु जामदार
57 किलो
प्रथम पै विराज धस
दृतिय पै आदित्य जगताप
61 किलो
प्रथम पै विशाल कोकाटे
दृतिय पै निखिल वाडेकर
65 किलो
प्रथम पै चैतन्य पिंगळे
दृतिय पै संकेत मारने



70 किलो
प्रथम पै वरद कवितके
दृतिय पै अथर्व मातेरे
74 किलो
प्रथम पै रितेश पवळे
दृतिय पै तेजस शिंदे
ओपन गट
प्रथम क्रमांक गणेश खङके
दृतिय क्रमांक पृथ्वीराज खड़के
कुमार महिला ओपन गट विजेत्या
प्रथम क्रमांक पै आर्या बाणेकर
दृतिय क्रमांक पै स्वेता ववले
तृतीय क्रमांक पै सृष्टि रायरिकार
चतुर्थ क्रमांक पै प्रांजली करपे



