समाजाची गरज ओळखून योजना राबविणे गरजेचे आहे. कोथरूडमध्ये असेच सेवा प्रकल्प सुरू आहेत.- मंत्री चंद्रकांत पाटील

माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना रेनकोट आणि प्रभागातील नागरिकांना छत्री वाटपाचा उपक्रम संपन्न
पुणे : समाजाची गरज ओळखून योजना राबविणे, हा माझा नेहमीच आग्रह असतो. त्या अनुषंगाने कोथरुडमध्ये विविध प्रकारचे सेवा प्रकल्प सुरू आहेत. माजी नगरसेवक दीपक पोटे यांनीही असेच उपक्रम राबविले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. असे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ चे माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना रेनकोट आणि प्रभागातील नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.

दीपक पोटे म्हणाले, माणुसकीची जाण आणि निस्वार्थ सेवा हेच आमचं ब्रीद समाजातील गरजूंना वेळोवेळी मदत करणे, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं हाच खरा समाजसेवेचा मार्ग आहे.ही गरज ओळखून मी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो.यंदा माननीय कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य कर्मचारी व नागरिकांसाठी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले.
पावसात आपली जबाबदारी निभावणाऱ्या सेवाभावी हातांना थोडा दिलासा देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न.समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी ही सेवा अशीच अविरत सुरू ठेवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊ.असेही पोटे म्हणाले.
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी,कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, प्रतिक देसरडा, माजी नगरसेवक जयंत भावे,माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, ॲड. मिताली सावळेकर,प्रशांत हरसुले, गिरीश खत्री, अमोल डांगे, दीपक पवार, ॲड. प्राची बगाटे, मंदार बलकवडे, अनुराधा एडके, आशिष काटे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि आरोग्य सेवक उपस्थित होते.






