रात्रपाळीत काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांवर होतायत हल्ले पोलीस व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष..!

त्वरित दखल घ्या अन्यथा आंदोलन..
पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने पुणे शहरात रात्रपाळी मध्ये सफाईचे काम करून “स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे “करण्याचा मानस प्रशासनाने घेतला आहे. पण पुणे महानगरपालिकेच्या रात्रपाळी मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना गुंड प्रवृत्ती, व्यसनी तसेच चोरी करणाऱ्या लोकांपासून मारहाण करणे, शिवीगाळ करणे अशा प्रसंगाना तोंड द्यावे लागत आहे. अशा घटना पुणे शहरात सातत्याने घडत असून पोलीस व प्रशासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुणे महानगरपालिका कामगार युनियनकडून करण्यात येत आहे.

कै. बा. स. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रं. २२, पुणे स्टेशन आरोग्य कोठीकडे रात्रपाळीत काम करणारे कायम सफाई सेवक हनुमंत लोंढे हे साधू वासवानी ते पुणे स्टेशन या रस्त्यावर ११.३० च्या सुमारास सफाई करत असताना दारू पिलेले रिक्षावाले थांबले होते. त्यांना सदर सेवकांनी विनंती की,”मला रस्ता साफ करायचा आहे तरी तुम्ही बाजूला व्हा.” असे दोन वेळेस सांगून देखील ते बाजूला झाले नाहीत.” त्यानंतर ते रस्ता सफाईचे काम करू लागले, तेव्हा झाडूच्या काड्या त्या रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला लागल्या म्हणून त्यांनी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करून रिक्षात ठेवलेला बांबू काढून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी प्रतिकार केला. पण सदर त्या व्यक्तींनी फोन करून इतर तीन व्यक्तींना बोलावून घेऊन त्यांचा मारण्यासाठी माझा पाठलाग केला. लोंढे यांनी जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन दुसऱ्या गल्लीत काम करणाऱ्या सहकारी मित्राला घटनेची माहिती दिली. त्यानंतर मोकादम यांना फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली. बंडगार्डन पोलीस स्टेशन अंकीत पुणे स्टेशन पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर संबंधीत पोलीस अमंलदाराने एफ. आय. आर. दाखल करून घेतली नाही. तक्रार साध्या कागदावर लिहून घेतली. त्यावर पोलिस म्हणाले की अशा घटना घडत राहातात त्याकडे दुर्लक्ष करायचे, आम्ही त्यांना बोलवून घेऊन चौकशी करतो आणि आपापले काम करायचे असा सल्ला देऊन पोलीस यंत्रणेने देखील हा प्रकार गांभीर्याने घेतला नसल्याचे पुढे आले आहे.






दुसरी घटना कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रं. ४१, टिळेकरनगर आरोग्य कोठी अंतर्गत रात्रपाळीत झाडण काम करणारा कंत्राटी कामगार बाळासाहेब पांडूरंग म्हस्के हे खडीमशिन चौक त इस्कॉन मंदीर परिसरात रस्त्याची सफाई करताना रात्रीच्या २ वाजता दोन तोंडावर रुमाल बांधलेल्या असण्यात व्यक्तींनी येऊन त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून जवळ असेलेला १८ हजार रुपयाचा मोबाईल व रोख ७५० रुपये हिसकावून घेऊन पळून गेले. सदर घटना घडल्यानंतर मोबाईल चोरीला गेल्यामुळे घडलेली घटना वरिष्ठांना सांगता आली नाही. सदर घटनेची माहिती सकाळी मोकादम व आरोग निरिक्षक यांना दिली. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर खडी मशिन पोलीस चौकीत तक्रार घेण्यास एकही पोलीस हजर नव्हते. म्हणून कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यास आरोग्य निरिक्षक, मोकादम व संबंधीत सफाई सेवक सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तक्रार नोंदविण्यास थांबले होते. तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. पुणे महानगरपालिका कामगार युनियनने दखल घेऊन पदाधिकारी यांनी संबंधीत पोलिस चौकीत जाऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली. सदर घटना रात्री २ वाजता घडली आणि एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे ६ वाजले.



पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट व जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांना सांगीतले आहे की,”रात्रपाळीत काम करणाऱ्या सफाई कामगारांवर जे जीवघेणे हल्ले व शिवीगाळीचे प्रकार होत आहेत याची त्वरित दखल घ्या. शिवाय मान्यताप्राप्त युनियनला विश्वासात न घेता कामाच्या वेळात जो एकतर्फी निर्णय घेऊन जो बदल केला आहे आणि महिला कामगांराना रात्रपाळीत सफाईचे काम करण्यास लावणे.” हे निर्णय आम्हाला मान्य नाही. जो काही कामाच्या वेळात बदल करायचा आहे तो मान्यताप्राप्त कामगार युनियन बरोबर चर्चा करून निर्णय घ्यावा. रात्रपाळीत काम करण्याचा एकतर्फी निर्णया बाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्त यांनी पुणे महानगरपालिका कामगार युनियन बरोबर स्वतंत्र बैठक घ्यावी” अन्यथा आम्हाला तिव्र अंदोलन करावे लागेल असे आवाहन त्यांनी केले आहे.






