भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणारे बप्पी लाहिरी यांचे निधन..

मुंबई : भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणारे प्रसिद्ध गायक संगीतकार बप्पी लाहिरी यांचे आज निधन झाले. ते अंगभर घालत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मुळे त्यांची एक वेगळी ओळख होती. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बप्पी लाहिरी हे चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. त्यांनी भारताला डिस्को संगीताची खऱ्या अर्थाने ओळख करुन दिली. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.
सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर त्यांनी भारतात लोकप्रिय केला. सैलाब वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती.
याद आ रहा है तेरा प्यार, तम्मा तम्मा लोगे, रात बाकी बात बाकी, जी ले ले जी ले ले, बैंबई से आया मेरा दोस्त, प्यार कभी कम नहीं करणा, आय एम अ डिस्को डान्सर, मौसम है गाणे का, मेरी जैसी हसीना, लैला मेरी लैला, जो भी किया मैने किया, ही त्यांची प्रसिद्ध गण्यांपैकी काही गाणी आहेत.




