पुणे शहर

पुण्यात भाजपचे उमेदवारांना डायरेक्ट एबी फॉर्म..सावध भूमिका घेत यादी जाहीर करणे टाळले.. कोथरूडमध्ये हे असणार उमेदवार

कोथरुड :  पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप पक्षाने सावध भूमिका घेत उमेदवारी यादी जाहीर न करता उमेदवारांना डायरेक्ट एबी फॉर्म देणे चालू केले आहे. काल पासून इच्छुक उमेदवार अंतिम उमेदवारी यादी जाहीर होण्याचे वाट पाहत होते. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीपासूनच काही उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले असून आज सकाळपासून फायनल केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मसाठी फोन येऊ लागले असल्याचे माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी नविन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे दिसत आहे.

Img 20251125 wa00126624322614302660332

भाजपने उमेदवारी यादी जाहीर करणार असे सांगत इच्छुक उमेदवार व विरोधी पक्षांना गाफील ठेवले होते. शिवसेने बरोबर युतीच्या वाटाघाटी सुरू असल्याची कालपर्यंतची बातमी होती. पण आज अचानक एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू झाला आहे. आता शिवसेनाही एबी फॉर्म द्यायला सुरुवात करणार का हे पाहावे लागणार आहे. भाजपच्या जाहीर झालेले उमेदवार पाहता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्ये सुसूत्रता दिसून येत असून पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली असल्याचे दिसत आहे. काही प्रभागात विद्यमान नगरसेवकांना झटका बसला आहे. काही धडाडीच्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने पुढील निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार

प्रभाग क्रमांक 9 बाणेर पाषाण, सुस मध्ये अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहूल कोकाटे, रोहिणी चिमटे

प्रभाग क्रमांक 10 बाधन भुसारी कॉलनी मध्ये किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, अल्पना वर्पे, रूपाली सचिन पवार

प्रभाग क्रमांक ११ केळेवाडी मध्ये अजय मारणे, अभिजित राऊत, शर्मिला शिंदे

प्रभाग २९ मध्ये डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी मध्ये पुनीत जोशी, मीताली कुलदीप सावळेकर, मंजुश्री खर्डेकर, एका नावावर चर्चा सुरू आहे.

प्रभाग ३० कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनीमध्ये राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, रेश्मा संतोष बराटे, तेजश्री महेश पवळे

प्रभाग क्रमांक ३१ कोथरूड मयुर कॉलनी मध्ये पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती नवनाथ जाधव, हर्षाली माथवड

प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलरनगर सचिन दोडके, भारतभूषण बराटे, सायली वांजळे, हर्षदा भोसले

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये