पुणे शहर

हजारोच्या संख्येने रक्तदाते एकवटले आणि रक्तदान महासंकल्प दिवस सिद्धीस गेला. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा महायज्ञ..

पुणे : हजारोच्या संख्येने एकवटलेले रक्तदाते, रक्तदान करण्यासाठी तरुणांमध्ये असणारा उत्साह आज अनुभवता आला तो भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञामध्ये. दिवसभर या रक्तदान महायज्ञामध्ये रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांचा ओघ सुरू होता.

मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त ९ नोव्हेंबर हा दिवस रक्तदान महासंकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. हा रक्तदान महासंकल्प दिवस सिद्धीस नेण्यासाठी हजारोच्या संख्येने पुणेकरांनी यात सहभाग घेतला.

कर्वेनगर मधील राजाराम पूल – म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील पंडित फार्म या ठिकाणी बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत हा रक्तदान महायज्ञ पार पडला. मुरलीधर मोहोळ व या उपक्रमाचे संयोजक संस्कृती प्रतिष्ठान यांनी रक्तदानासाठी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहिला मिळाले. 

Img 20221108 wa03111149523490358263271

मोहोळ यांचा वाढदिवस नेहेमीच समजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो. रक्तदान हा त्यातला एक महत्वाचा उपक्रम. या बरोबरच आज दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांनी कन्या सिध्दी सोबत रक्तदान करत रक्तदान संकल्प दिवसात सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या ठिकाणी दिवसभर उपस्थित राहत मोहोळ यांनी पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक, राजकीय व्यक्ती, समर्थक यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला.

मागील वर्षी प्रमाणेच याही वर्षी पुणेकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला. पुणेकरांनी रक्तदान रुपी दिलेल्या शुभेच्छा गरजू रुग्णांना जीवदान देणाऱ्या ठरणार असल्याने यापेक्षा मौल्यवान शुभेच्छा असूच शकत नाहीत अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

Img 20221012 192956 045 1
Img 20221107 wa00231753521829434315593
Img 20221107 wa00246242446261228342920
Img 20221108 131809

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये