महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात; FB पोस्ट करत स्वतः च दिली माहिती

मंगळवारी रात्री परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही मिळाली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

“मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना, रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं धनजंय मुंडे म्हणाले. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

Screenshot 2023 0104 104344595064252156849646
Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये