भाजपा कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात चंद्रकांतदादा चिंब भिजले पहा व्हिडिओ सह बातमी…

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा भरपावसात कार्यक्रम
पुणे : पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण झाले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
https://youtube.com/shorts/MP6Og-HEwVE?feature=share
फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले. यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असल्याने, त्यांनी मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.




