पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार संवाद; मुख्यमंत्री उद्या पुणे दौऱ्यावर

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या आरतीने होणार दौऱ्याची सुरूवात
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या आरतीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी साधणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पुण्यातील गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव किरण साळी यांनी दिली आहे.

गेल्याच आठवड्यात दही हंडी, गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेत मागे घेतले आहेत. तसेच गणेशोत्सव कालावधीतले निर्बंध हटविण्यात आले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.






