पुणे शहर

सणस मैदानावरील सिंथेटिक ट्रॅक तयार असूनही खेळाडूंसाठी बंद ; राष्ट्रवादी अर्बन सेलने आयुक्तांकडे केली ही मागणी..

पुणे : पुणे महानगरपालिकेने सारसबाग जवळ बाबुराव सणस मैदानावर ३.७२ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक विकसित केला. सदर अत्याधुनिक मैदान खेळाडूंसाठी पूर्णपणे तयार असूनही निव्वळ उद्घाटनाच्या कारणास्तव बंद असल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर सदर मैदान खेळाडूंकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम, समन्वयक स्वप्नील दुधाने, उप-समन्वयक स्वप्नील खडके यांच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

सणस मैदानावर ३.७२ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक विकसित करण्यात आल्याने खेळाडूंमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पण मैदान सुरू असून ते वापरता येत नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी आहे. महानगरपालिकेच्या दोन विभागांमध्ये समन्वयाचा असलेला अभाव हा या मैदानाच्या लोकार्पण सोहळ्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर ठरला असल्यानेच खेळाडूंचे नुकसान होत असल्याचा आरोप अर्बन सेलचे स्वप्नील दुधाने यांनी केला आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

युवांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात आजमितीस अनेक खेळाडू उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील असताना अनेकदा प्रशासकीय अनास्थेच्या कारणास्तव स्पर्धेत मागे पडत असल्याचे दृश्य दिसून येते. अशावेळी पुणे महानगरपालिकेने खेळाडूंसाठी मैदान साकारत नक्कीच चांगले कार्य केले असले तरी हे मैदान खेळाडूंकरिता उपलब्ध होणे गरजेचे आहे.

महानगरपालिकेत प्रशासक नेमले असताना त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सर्व खेळाडू तसेच नागरिकांच्या भावनांचा आदर करत आपण या निवेदनाचा सकारात्मक विचार करावा आणि लवकरच सदर मैदान खेळाडूंच्या सेवार्थ उपलब्ध करावे अशी विनंती राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने निवेदनाद्वारे आयुक्तांना करण्यात आली आहे.

Img 20230524 wa0027
Img 20230524 wa0032
Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये